अनोख्या रेशीमगाठी

(2 customer reviews)

 300.00  240.00

लेखकाने ‘लिव्ह इन’सारखा पर्याय निवडूनही कुठेही उथळपणा येऊ दिला नाही. आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन हा प्रश्न सामर्थ्याने मांडताना त्यांनी आपल्या परंपरा, रीतिरिवाज जपले आहेत. अशा धाडसी विषयाला हात घालूनही संस्कार आणि संस्कृतीला मूठमाती दिली नाही. दोन पिढ्यातील प्रेमसंबंध फुलवताना कुठेही वाह्यातपणा येऊ दिला नाही. एकमेकांना समजून घेणे, आधार देणे, दुःखातून सावरायला मदत करणे यातून त्यांनी ही कलाकृती साकारली आहे.

999 in stock

पुस्तकाबद्दल

विवाहसंस्था समजून घेण्याच्या आधीची एक महत्त्चाची पायरी म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था समजून घेणे! त्याच्याच प्रांजळ प्रतिबिंबातून या अनोख्या रेशीमगाठी सिद्ध झाल्या आहेत. वाचकांनी ही कादंबरी वाचणे, समजून घेणे आणि जमल्यास आचरणात आणून अशा परिस्थितीतील स्त्री-पुरूषांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणे हेच या कलाकृतीचे फलित असणार आहे.

अधिक माहिती

लेखक

रवींद्र कामठे

पाने

192

Publisher

2 reviews for अनोख्या रेशीमगाठी

  1. Sunil Pande

    सुप्रसिद्ध लेखक श्री रवींद्र कामठे यांचे अनोख्या रेशीमगाठी ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी आणि संग्रही ठेवावी अशीच आहे . लिव्ह इन रिलेशशिप हा विषय पहिल्यांदाच कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात आलेला आहे . कादंबरी मोठी वाचानिय झाली आहे . कुठेही त्यात बटबटीतपणा आलेला नाही . इतका नाजूक विषय अतिशय उत्तम पद्धतीने लेखकाने मांडला आहे . लेखकाची लेखनशैली प्रसन्न , ओघवती आहे . वाचताना कुठेही कंटाळा येत नाही . कोकणातील निसर्गाचे वर्णन तर लाजवाब . आदर्श कुटुंबाची व्याख्या जाणून घ्यायची असेल तर ही कादंबरी प्रत्येकाने नक्कीच वाचली पाहिजे . मातृभक्त , आदर्श मुलगा , आदर्श बंधू , आदर्श मित्र या सगळ्याचे दर्शन नायकात दिसून येते . दोन पिढ्यांची ही प्रेमकथा अफलातून अशी आहे . आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यावर स्त्रीलाच नव्हे तर पुरूषालाही स्त्रीची किती गरज असते हे सांगण्यात लेखक यशस्वी झाला आहे . अभिनंदन . एक उत्तमआणि वाचनिय कादंबरी !! सुनील पांडे, नीरा.

  2. Mandar Bhuskute

    प्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. रवींद्र कामठे सर लिखित “अनोख्या रेशीमगाठी” ही कादंबरी आज वाचून झाली. या कादंबरीमध्ये सरांनी “लिव्ह इन रिलेशनशिप” हा विषय इतका सुबकपणे हाताळला आहे की एका बैठकीत कादंबरी कधी वाचून झाली ते समजलंच नाही.
    “पृथ्वीवरील स्वर्ग” असलेल्या आंजर्ले गावाचे यथार्थ चित्रण वाचून आपल्याला अगदी कोकणात गेल्यासारखं वाटते.
    कोकणातल्या आजीची दूरदृष्टी आणि सकारात्मकता तर अगदी योग्य प्रकारे रेखाटली आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या मानसिकतेमधून बाहेर येण्यासाठी आपल्या सर्वांना या आजीसारखा विचार करण्याची गरज आहे.
    “लिव्ह इन रिलेशनशिप” सारख्या विषयावर मार्मिक भाष्य केल्याबद्दल श्री. रवींद्र कामठे सरांचं खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
    मंदार भुस्कुटे

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *