₹ 200.00 ₹ 160.00
ज्येष्ठ पत्रकार, व्यासंगी कवी आणि एक सुहृदयी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीराम ग. पचिंद्रे यांनी हा ठेवा उपलब्ध करून दिलाय. विविध गाण्यांचं रसग्रहण करताना त्यांनी अतिशय नेमकेपणानं त्याचं जे वर्णन केलंय ते केवळ अद्वितीय आहे. या गाण्यांविषयी वाचताना आपण ती कधी गुणगुणु लागतो हे आपल्याही लक्षात येत नाही. शिवाय श्रीराम पचिंद्रे यांचं शब्दवैभव आणि या श्रीमंतीतून त्यांची शब्दांवरील हुकूमी पकड यामुळं हे लेख वाचताना आपण रोजच्या ताणतणावापासून कोसो मैल दूर जातो. मराठीबरोबरच हिंदी-उर्दू शब्दांवरील त्यांची हुकूमत वाखाणण्याजोगी आहे. ‘अवीट गाणी’ हे पुस्तक आपल्याला समृद्ध करेल आणि गायकीच्या विश्वाची आनंददायी सफर घडवून आणेल हे नक्की!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed