बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा
₹ 250.00 ₹ 200.00
भारतीय इतिहासातील ‘सहा सोनेरी पाने’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मांडली होती. जेव्हा जेव्हा आपलं राष्ट्र आक्रमकांच्या टाचेखाली पिचलं, चिरडलं गेलं तेव्हा तेव्हा शौर्य आणि पराक्रमाची परंपरा तेवत ठेवणाऱ्या आपल्या वीर पुरूषांनी जे अचाट साहस दाखवलं त्यांची सावरकरांनी ‘सोनेरी पाने’ म्हणून यथायोग्य दखल घेतली. कोकणातील निसर्गप्रेमी पत्रकार श्री. जे. डी. पराडकर यांनी त्यांच्या आजूबाजूला होऊन गेलेल्या काही व्यक्तिरेखा निवडून त्यांचं प्रभावी शब्दचित्रण केलं आहे. इथला सामान्य माणूस हा राष्ट्राचा कणा मानला तर जेडींनी निवडलेल्या या व्यक्तिरेखा दखलपात्र आहेत. कोकणातील सामान्य माणूस अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यावर मात करत जगतो कसा, वागतो कसा हे अनुभवायचं असेल तर हे पुस्तक वाचावंच लागेल. ही ‘सोनेरी पानं’ जेडींच्या लालित्यपूर्ण शैलीनं ओथंबलेली आहेत. त्याच्या जोडीलाच ‘डोंगरावरच्या कथा’ ही दिल्यानं या व्यक्तिचित्रणांची मूळं मातीला घट्टपणे बिलगलेली आहेत. अठरा पुराणं आणि सहा शास्त्रं या पुस्तकातील चोवीस नायकांना ज्ञात असतील नसतीलही! मात्र वेदांचा अभ्यास करताना सामान्यांच्या वेदना समजून घ्यायच्या असतील तर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ‘ही व्यक्तिचित्रं वाचताना आम्हाला पानापानांवर पुलं आठवले’ असं कोणी म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती ठरू नये, अशी सशक्त मांडणी जे. डी. पराडकर यांनी केली आहे.
– घनश्याम पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed