बारीकसारीक गोष्टी

 99.00  89.10

मोठा माणूस कसा ओळखायचा याचं एक सूत्र आहे. तो करत असलेल्या बारीकसारीक गोष्टींची, त्याच्या स्वभावाची, सवयींची पारख करा. काही वेळात त्या माणसाचं चरित्र आणि चारित्र्य तुमच्या ध्यानात येईल. बारक्या कृतीतून त्याचं मोठेपण लक्षात येतं. म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात या बारीकसारीक गोष्टींचं खूप मोठं महत्त्व असतं.

493 in stock

पुस्तकाबद्दल

मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील मंगरूळसारख्या एका छोट्या गावात राहणार्‍या शिरीष पद्माकर देशमुख यांनी अशाच बारीकसारीक गोष्टींतून खूप मोठा बोध आपल्याला दिला आहे. शिरीष देशमुख हे शिक्षक आहेत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते काळ्या मातीत राबणारे शेतकरी आहेत. बालगोपाळांचं मानसशास्त्र त्यांना चांगलं उमगतंच पण आजूबाजूच्या परिस्थितीत परिवर्तन घडवायचं तर वरवरच्या बदलांना काही अर्थ नसतो याची त्यांना जाणीव आहे. माणसानं अंतर्बाह्य निर्मळ आणि निडर व्हावं असं त्यांना वाटतं. त्यातूनच या कथा जन्मास आल्या आहेत.

बारीकसारीक गोष्टी या फक्त बालकुमारांसाठीच नाहीत तर मोठ्यांनाही यातून बोधामृत मिळेल. आपण काही फार मोठा उपदेश करतोय आणि त्यातून समाजसुधारणा घडेल असाही त्यांचा आव नाही. या गोष्टी थेट मनावर बिंबतात, हृदयाला भिडतात. आपल्या संस्कारांचं आणि संस्कृतीचं संचित शिरीष देशमुखांनी या कथांच्या माध्यमातून दिलंय. मुलांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांचं मनोबल उंचवावं, या देशाचे सशक्त, भक्कम आणि सुदृढ नागरिक म्हणून त्यांची जडणघडण व्हावी यासाठीचं हे बाळकडू आहे. एखाद्याच्या आयुष्यात बाळगुटी जितकी महत्त्वाची तितक्याच या कथा बालकुमारांसाठी संजीवक ठरणार्‍या आहेत.

अधिक माहिती

लेखक

शिरीष पद्माकर देशमुख

पाने

४८

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बारीकसारीक गोष्टी”

Your email address will not be published. Required fields are marked *