दरवळ

(3 customer reviews)

 200.00

घनश्याम पाटलांचा हा ग्रंथ शाश्वत मूल्यांचा आग्रह धरणारा, शाश्वत समतेचा पुरस्कार करणारा, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा, वाचकांचे वाचन वाढविणारा आणि मातीत राबणार्‍या शेतकर्‍यांपासून ते मातीमोल आयुष्य जगणार्‍या माणसांची नोंद करणारा, सदाचार, सद्भाव, मैत्र, प्रेम, पुस्तकप्रेम, कारुण्य, उदारता, जिव्हाळा आणि अभिजात साहित्यप्रेम यांचा उत्कृष्ट नमुना आहे. तो या एकाच ग्रंथात एकजीव झाला आहे. म्हणून तो प्रत्येकाने जिवाभावाने वाचला पाहिजे.
– डॉ. द. ता. भोसले
‘चपराक’चे संपादक, प्रकाशक घनश्याम पाटील यांचे हे नवे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवे.

Darval By Ghanshyam Patil.

ISBN: 9789386421487 Category:

पुस्तकाबद्दल

‘चपराक’चे संपादक, प्रकाशक घनश्याम पाटील यांचे हे नवे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवे.

Darval By Ghanshyam Patil.

अधिक माहिती

लेखक

घनश्याम पाटील

पाने

128

Publisher

3 reviews for दरवळ

 1. Nandkishor

  दरवळ मुळे मनाला आलेली मरगळ नाहीशी झाली आणि अर्थातच मन सुगंधित झाले. अभिजात साहित्यातील सद्गुण, सौहार्द, मैत्री, प्रेम, पुस्तकप्रेम, करुणा, औदार्य, आत्मीयता आणि प्रेम यांचे ते खरोखरच उत्तम उदाहरण आहे.
  खूप छान

 2. Rakesh Shantilal Shete

  *पुस्तक परिचय:*

  ‘दरवळ’ म्हणजे पंचवीस लेख, पंचवीस फुलांनी गुंफलेली माला आणि त्याचा येणारा सुगंध. तो पुण्यातून बेंगळुरू पर्यंत पोहोचला हे नक्की. गेल्या एका आठवड्यात बाहेरगावीच्या कामातूनही मी वेळ काढत झपाट्याने हे पुस्तक वाचून संपवलं. प्रत्येक लेख वाचून झाल्यावर मी अंतर्मुख होत गेलो.
  प्रत्येक लेखामध्ये तटस्थपणे, दोन्ही बाजूंनी विचार करत निरीक्षणे व मते नोंदविण्याची लेखकाची हातोटी उत्तम आहे. यामध्ये जगभरातील जाती, नेते, लोक, स्त्री-पुरूष यांच्या किश्शांची रेलचेल आहे. श्रेष्ठ नेत्यांचे चांगले गुण दाखवताना, त्यांचे कानहीं पकडले आहेत. त्यांना बेधडकपणे चपराकसुध्दा लगावली आहे.
  थोर राजे, संत महात्मे यांच्या शिकवणीचे भरपूर दाखले दिले आहेत. महापुरुषांचा त्यांच्या अनुयायांनी करत असलेला पराभव वाचून शिकण्यासारखे आहे.
  वारी, साहित्य मेळावे, स्त्री-सशक्तीकरण, शेती व शेतकरी, शाकाहार, भूक, देशभक्ती, पुरोगामी व प्रतिगामी यातील फरक; अपघात, रस्ते नियम व जनजागृती, जातियवाद; कट्टरतावादातून घडणारा दहशतवाद – असे असंख्य विषय, त्यातील बारीक निरीक्षणे लेखकाने सर्व बाजूंनी मांडले आहेत.
  चालू घडामोडींतून लोकांनी केलेला विपर्यास, नाहक बळी जाणारी जनता, आणि त्यातून पुढच्या पिढीने शिकण्यासारखे आहे.
  जेष्ठ साहित्यिकांचा सुरुवातीचा खडतर काळ, आताचे दुर्लक्षित साहित्य क्षेत्र, आणि लेखकाने नवलेखकांना दिलेली साथ वाचून कृतज्ञ व्हायला होते.
  प्रत्येक लेखाच्या शेवटी वाचकांनी काय करायला हवे, हे लेखकाने उत्तमरीत्या सांगितले आहे.

  *लेखक परिचय:*
  घनश्याम पाटील, हे ‘चपराक प्रकाशन’ या संस्थेचे प्रकाशक, संचालक, महाराष्ट्रातील सर्वांत कमी वयाचे स्वतंत्र संपादक आहेत. त्यांचे मराठी साहित्य जगभर पोहोचले आहे.

  वाचाच!

 3. Rakesh Shantilal Shete

  पुस्तक परिचय:

  लेखक परिचय:
  घनश्याम पाटील, हे ‘चपराक प्रकाशन’ या संस्थेचे प्रकाशक, संचालक, महाराष्ट्रातील सर्वांत कमी वयाचे स्वतंत्र संपादक आहेत. त्यांचे मराठी साहित्य जगभर पोहोचले आहे.

  वाचाच!

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *