पुस्तकाबद्दल
काळ, परिस्थिती, अंधश्रद्धा, राष्ट्र तसेच समाजशत्रू इत्यादींवर मात करत इतिहासात आपले नाव अजरामर करणार्या भारतीय महिलांचे थोडक्यात चरित्रवर्णन सुरेखा बोर्हाडे यांनी ‘देदीप्यमान शलाका’ या पुस्तकात केले आहे. सुरेखाताईंनी नेमक्या शब्दात आणि प्रेरणादायी शैलीमध्ये या महान स्त्रियांची जीवनगाथा आपल्यासमोर मांडली आहे. वैदिक काळापासून ते स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत राजकीय, सामाजिक, स्वातंत्र्य, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीतही आपल्यातील शौर्य, भक्ती, सहनशक्ती, संयम, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि नेतृत्वाचे सर्वोच्च उदाहरण प्रस्थापित करणार्या या स्त्रिया म्हणजे प्रत्येक पिढीला तिमिरात मार्ग दाखवणार्या ‘देदीप्यमान शलाका’च आहेत. त्याकरता हे पुस्तक आपल्या संग्रहात असायलाच हवे.
-ज्योती घनश्याम
Reviews
There are no reviews yet.