गावपण शोधताना…

 150.00  120.00

‘काळीजकाटा’ या आंतरिक प्रेमाचं सुंदर मंदिर असलेल्या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर सांगोला तालुक्यातल्या चोपडीसारख्या एका छोट्या गावातील मोठ्या लेखकाचं हे पुस्तक वाचकांसमोर येत आहे. ‘खेड्याकडे चला’ असा संदेश महात्मा गांधींनी दिला मात्र तिथं जाऊन करायचं तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. गावाशी नाळ जोडून असलेला माणूसच इथल्या जीवनाचं मर्मस्थान ओळखू शकतो.

499 in stock

पुस्तकाबद्दल

हे पुस्तक शहरी आणि ग्रामीण असा भेद निर्माण न करता गापल्या गावाचा, आपल्या मातीचा, आपल्या संस्कृतीचा वेध घेतं. आजचं गांव कसं बदलत चाललंय हे सांगतानाच गावाचं सामर्थ्य अधोरेखित करतं. ‘जे न करी राव, ते करी गाव’ असं म्हटलं जातं ते उगीच नाही. सुनील जवंजाळ या प्रतिभासंपन्न आणि संवेदनशील लेखकानं गावाचा घेतलेला हा शोध थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्याशी नातं सांगणारा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि भौतिक प्रगतीची वाट चोखाळताना आपल्या मुळांचा विसर पडू नये या प्रांजळ भूमिकेतून हे पुस्तक सिद्धीस गेलं आहे. अनेकांना हे पुस्तक आपल्या बालपणात घेऊन जाईल, अंतर्मुख करेल आणि अंतःकरणातल्या व्यापक कळवळ्यातून गावाच्या ओढीचा गोडवा वाढविण्यास मदत करेल असं वाटतं.

अधिक माहिती

लेखक

सुनील जवंजाळ

पाने

104

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गावपण शोधताना…”

Your email address will not be published. Required fields are marked *