पुस्तकाबद्दल
जनार्दनआबा देवरे यांनी या छोटखानी पुस्तकातून ‘शहीद-ए-आझम’ सरदार भगतसिंह यांच्या जीवन आणि चरित्राचा अचूक वेध घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित ठेवणारे हे पुस्तक मुलांनी आणि पालकांनी वाचायलाच हवे. यातून आपल्या देशाची त्याग आणि समर्पणाची परंपरा दिसून येते. एक अतुलनीय धाडस आणि पराकोटीच्या संघर्षातही कायम उंचावलेले मनोधैर्य याची शिकवण मिळते. ‘देशभक्ती म्हणजे काय?’ या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी भगतसिंहासारख्या क्रांतिवीराचे चरित्र वाचायला हवे. या पुस्तकातून त्यांच्याविषयीची माहिती तर मिळतेच पण स्वातंत्र्यचळवळीतील अन्य क्रांतिकारकांचा अभ्यास करण्याची प्रेरणाही जागृत होते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्या आणि आपल्या प्राणाची किंमत मोजून आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद मिळवून देणार्या सरदार भगतसिंह यांचे हे चरित्र नक्की वाचा.
इन्कलाब झिंदाबाद!
– घनश्याम पाटील
Reviews
There are no reviews yet.