पुस्तकाबद्दल
“सर्वात आधी मी जसे सुचेल तसेच लिहित गेलो. वाचन तर चालूच होते. त्यातूनच माझा शब्दसंग्रह दिवसागणिक वाढतच होता. असे लिहिता लिहिता अचानक मला माझ्या कवितांमध्ये काही काही विषयांचा भास होऊ लागला. त्यातूनच माझ्या मनामध्ये एक नवीन संकल्पना आकार घेऊ लागलो आणि मी वेगवेगळ्या विषयांवरील म्हणजे प्रेम, विरह, स्वप्न, मन, पाऊस, भावनिक, काल्पनिक, शृंगारिक, वैचारिक, सामाजिक, प्रासंगिक, वैयक्तिक वगैरे विषयांवरील कविता करू लागलो.
माझे आपल्या सर्वांपर्यंत पोहचण्याचे एक माध्यम आहे असे वाटते म्हणून हा सगळा खटाटोप…
ह्याच विचारांनी मी तुम्हांला माझ्या कवितांच्या प्रवासाला आता घेऊन जात आहे. मला खातरी आहे की तुमचा हा प्रवास नक्कीच सुखकर आणि प्रफुल्लीत करणारा असेल व तुमच्याशी संवाद साधण्याचा माझा हा एक प्रयासच म्हणावालागेल.”
– रवींद्र कामठे
Reviews
There are no reviews yet.