पुस्तकानुभव

Original price was: ₹ 300.00.Current price is: ₹ 240.00.

एखादं चांगलं पुस्तक किंबहुना त्यातला एखादा परिच्छेद, एखादं वाक्यसुद्धा आपल्या आयुष्याला सुयोग्य दिशा देण्यास पुरेसं ठरतं. अभ्यास आणि संशोधन या दोन्ही पातळीवर सर्वोच्च भरारी घेत सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी 1830 ते 1910 या कालखंडातल्या दुर्मीळ पुस्तकांचा धांडोळा घेतला आहे. त्यामुळे या एकाच पुस्तकातून आपल्याला पन्नास सर्वोत्तम पुस्तके वाचण्याचा आनंद मिळणार आहे आणि आपल्या माहितीत, ज्ञानात भर पडणार आहे. ज्ञानाची साधना करताना शंभर वर्षांपूर्वी कोणत्या विषयावरील पुस्तके प्रकाशित होत होती हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

500 in stock

पुस्तकाबद्दल

प्रा. फडके सरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ही जुनी ग्रंथसंपदा मिळवली, ती वाचली आणि त्या विषयी परिचय स्वरूपात लिहून वाचकांच्या हाती दिली, हे कार्य मराठी साहित्यविश्वाच्या दृष्टिने दखलपात्र आहे. हा ज्ञानामृताचा घडा आपल्या सर्वांना समृद्ध करणारा आहे. नव्याचा ध्यास घेतानाच ‘जुनं ते सोनं’ हे या पुस्तकाने सप्रमाण सिद्ध केलं आहे. यातील पुस्तकांच्या विषयांचे वैविध्य बघितले तर कोणीही अचंबित होईल. आजच्या काळालाही मार्गदर्शक ठरतील असे विचारधन यात सामावलेले आहे.
ग्रंथ आणि प्रकाशन व्यवहारात अनेक बदल झाले असले तरी शंभर वर्षांपूर्वीचे हे वैभव आपल्या भाषेचा अभिजातपणा सिद्ध करणारे आहे. मराठीला आज जरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी या पुस्तकानुभवाची अनुभूती घेताना आपल्या मनातील न्यूनगंड गळून पडेल. आपल्या अस्मितेच्या पाऊलखुणा आपले मनोधैर्य उंचावणार्‍या आणि आपल्याला बळकटी देणार्‍या आहेत. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेची चर्चा करताना हा पुस्तकानुभव मैलाचा दगड ठरेल हे नक्की.

-घनश्याम पाटील

अधिक माहिती

लेखक

सुहास कोळेकर

पाने

128

Publisher

Chaprak Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुस्तकानुभव”

Your email address will not be published. Required fields are marked *