समूदादा

 140.00  112.00

समूचा हजरजबाबीपणा, त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि त्याच्या अनेक लीला वाचताना मुलांवर आणि पालकांवरही संस्कार होतात. तांडेकाका-काकू आणि समूदादाचे मित्र म्हणून आलेली सर्वच पात्रं आपल्यापुढे अनेक आदर्श प्रस्थापित करतात. मुलांना भुरळ घालेल अशा अतिशय साध्या-सोप्या भाषेत या कादंबरीची मांडणी केल्यानं ही फक्त एक कलाकृती झाली नसून त्याला एका ‘संस्कार केंद्राचं’ महत्त्व प्राप्त झालं आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना बँडपथक लावून वाजतगाजत पाठवायची शेवाळकरांची कल्पना देशाचं उद्याचं भवितव्य असलेल्या पिढीविषयी त्यांच्या मनात किती व्यापक आणि उदात्त भावना आहेत, हेच दाखवून देते. ‘आजची पिढी वाया गेलीय’ असं कुणाला वाटत असेल तर त्यांनी तत्त्परतेनं ‘समूदादा’ वाचावी आणि आपल्या मुलांनाही वाचून दाखवावी. आजच्या काळात ही कादंबरी मुलांसाठी ‘बुस्टर डोस’ असेल हे नक्की.

Buy now Read more