पुस्तकाबद्दल
स्वतः वैद्यकीय पेशाशी संबंधित नसतानाही आरोग्य क्षेत्राविषयी त्यांनी जो अभ्यास केला तो दखलपात्र आहे. शिवाय या विषयावर लिहिताना त्यांनी कुठेही क्लिष्टता येऊ दिली नाही. अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेत त्यांनी जे आरोग्य प्रबोधन केले आहे ते लाखमोलाचे आहे. जे आपण आपल्या शासकीय, प्रशासकीय व्यवस्थेने करायला हवे ते या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याची किमया राजेंद्र देशपांडे यांनी साधली आहे. हे पुस्तक आपण वाचावे, आपले स्नेही, आप्तेष्ट, मित्र परिवार, सहकारी, कर्मचारी यांना प्राधान्याने भेट द्यावे. असे घडले तर ही सुद्धा एक सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल असे मला वाटते. राजेंद्रजी देशपांडे यांना पुढील लेखनप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
– घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक
Reviews
There are no reviews yet.