राहुलखुणा

 350.00  280.00

मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक, ‘मनोरंजन, संस्कार आणि प्रेरणा’ या त्रिसूत्रीवर दृढ विश्वास ठेवून वाटचाल करणारे लेखक डॉ. राहुल अशोक पाटील यांचं आपल्यातून जाणं खूपच वेदनादायी आहे. मेणबत्तीतल्या दोर्‍याप्रमाणं साहित्याशी एकरूप झालेल्या पाटील सरांची वाटचाल आत्ता कुठं सुरू झाली होती. मराठी साहित्यशारदेच्या दरबारात लक्षणीय योगदान देण्याची क्षमता असलेला हा अफाट प्रतिभेचा बेभाट माणूस आज आपल्यात नाही, यावर विश्वास ठेवणं म्हणूनच कठीण जातं. त्यांच्या पत्नी विजयाताई पाटील यांनी अतिशय धीरोदात्तपणा दाखवत या ग्रंथाचं संपादन केलं आहे.

998 in stock

पुस्तकाबद्दल

पाटील कुटुंबीयांचं दुःख सांत्वनापलीकडचं असलं तरी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षेच्या प्रांतात योगदान पेरणार्‍या डॉ. राहुल यांच्याविषयीच्या सर्वांच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. एखाद्या चरित्राप्रमाणंच या स्तृतिग्रंथातून राहुल पाटील यांचं जगणं आणि वागणं उलगडत जाईल आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल याची खातरी वाटते.

अधिक माहिती

संपादन

विजया राहुल पाटील

पाने

272

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राहुलखुणा”

Your email address will not be published. Required fields are marked *