मंतरलेले दिवस

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 200.00.

बालपणाचा काळ सुखाचा…! अशी एक स्मरणरंजन परंपरा शब्दबद्ध करण्याचा सराव आता मराठी ललितगद्य दालनात चांगलाच रुजला आहे. ‘डोह’ नंतरच्या लेखक पिढीने ती परंपरा आत्मसात केलेली आहे.

सभोवतालच्या भोवतालास आणि घर अंगणास भावपूर्णतेने तर कधी भावुकतेने रंगवता रंगवता आपली वडील माणसे, पाळीव प्राणी तसेच वृक्षवल्लीही अशा गद्य लेखनात समूर्त होऊन साकारतात तेव्हा वाचन रोचक होते. अशी अनुभूती कोकणचे लेखक जे. डी. पराडकर यांच्या ‘मंतरलेले दिवस’ या पुस्तकाच्या वाचनातून येते. बालपणी भयभीत कुतूहल वाढवणारी ‘छबिना ‘सारखी गाव परंपरा असो अथवा गडद अंधारात लख्ख प्रकाशाने उजळणारी ‘बत्ती सारखी नित्याची वस्तू असो ती प्रोढत्वी सुद्धा निजशैशवाकडे घेऊन जाते. गतकालीन माणसांच्या आठवणी तर अनेकदा हुरहूर लावून जातात. माती तशी माणसे आआंबेड खुर्दच्या ‘चिमट्या’त तर ती देव्हाऱ्यात स्थानापन्न होऊन अवतरतात, मग तो बाह्यतः आडदांड वाटणारा पण अंतरी सुहृदय असणारा शंकरकाका असो वा सोमा असो किंवा सोशिकतेची मूर्ती ठरणारी माई असो. जे. डी.चे पाळीव प्राण्यांचे प्रेम म्हणजे तर जणू बालसवंगडीच! असे ‘मंतरलेले दिवस’ प्रत्येकाच्याच बालपणी असतात पण ‘गावाकडच्या गोष्टी’ रसाळपणे ऐसपैस सांगणारा जे. डी. पराडकर एखादाच त्या शब्दांकित करतो.

– डॉ. सुरेश जोशी
लेखक आणि समीक्षक

500 in stock

अधिक माहिती

लेखक

जे. डी. पराडकर

पाने

120

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मंतरलेले दिवस”

Your email address will not be published. Required fields are marked *