पुस्तकाबद्दल
फुलं आणि स्त्री ह्या वेगळ्या असूच शकत नाहीत. स्वतःच्या आईची गोकर्ण फुलांची आवड पराडकरांच्या लेखणीने अप्रतिम उलगडली आहे. ही रंगीबेरंगी फुलं किती जादुई हे त्यांनाच उमजतात. कुठेही जावो जेडीची नजर कायम निसर्गातील फुलं शोधते. मग ते नुसते फुलं बघून थांबत नाहीत तर त्याची लागवड, जोपासना करायचा प्रयत्न करतात. नक्कीच हा गुण त्यांच्या आईकडून त्यांनी घेतला आहे.
प्रत्येक फूल आणि निव्वळ त्याच्या सौंदर्याचे अतिशय लुब्ध करणारे लोभसवाणे वर्णन या पुस्तकात नाही तर त्याबाबत सखोल माहिती सदर पुस्तकात आहे. वाचकहो, तुमच्या ताणावर फुंकर असे या लेखनाचे वर्णन आपणास या पुस्तकाबद्दल करता येईल. मुख्य म्हणजे त्याचे कोणतेही पान कुठेही, कधीही उघडून वाचा तुम्हाला सुखद गारवाच जाणवेल.
खूप शुभेच्छा….!
जे. डी. पराडकर
स्वाती साठे
-कारागृह उपमहानिरीक्षक
Reviews
There are no reviews yet.