पुस्तकाबद्दल
अनिल पाटील यांनी भारत सरकारतर्फे इराकमध्ये रेल्वेचं जाळं निर्माण करुन देण्यात हातभार लावला. आपल्याकडे रेल्वे विभागाच्या कामकाजाचं चित्रण कथेच्या माध्यमातून फारसं झालं नव्हतं. ती कसर अंशतः का होईना या कथासंग्रहात त्यांनी भरुन काढलीय. त्यांच्या भाषेचा लहेजा, निवडक प्रसंग हेरुन त्यातून डेरेदार कथाबीज फुलविण्याची त्यांची हातोटी विस्मयकारक आहे. या कथांतील भावभावनांचं रेखाटन आपल्याला त्या-त्या पात्रात, प्रसंगात घेऊन जातं. अनिल पाटील यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते वाचकांना त्यांच्या कथानकात गुंतवून ठेवतानाच व्यापक विचार करण्याची दृष्टिही देतात. ती देताना त्यात कुठेही प्रबोधनाचा, समोरच्याला ‘शिकवण्या’चा आव नसतो. माणसाचं माणूसपण अधिक व्यापक व्हावं अशी निर्मळ तळमळ मात्र खच्चून भरलेली असते.
Reviews
There are no reviews yet.