पुस्तकाबद्दल
डॉ. पटवर्धनबुवा भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासामधील प्रभावी व्यक्ती होते आणि त्यांनी कीर्तनात महत्त्वाची नवीन परंपरा स्थापना केली. म्हणून हे पुस्तक इतिहासाच्या संशोधकांसाठी मौल्यवान साधन असेल. डॉ. पटवर्धन यांच्या प्रभावाचे एक कारण म्हणजे लोकमान्य टिळकांशी त्यांचे संबंध. लो. टिळकांनी कीर्तनाची शक्ती ओळखली आणि त्यामुळे ते म्हणाले की, ‘‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’’ त्यांना माहीत होते की वर्तमानपत्रे फक्त साक्षर लोकांसाठी होती परंतु कीर्तनाचा संदेश सर्वांना समजू शकेल. याव्यतिरिक्त कीर्तनाची गाणी व कथांनी लोकांच्या मनाला स्पर्श केला.
लोकमान्य टिळकांनी डॉ. पटवर्धनबुवांना कीर्तनकार होण्यासाठी प्रोत्साहित केले. लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादाने डॉ. पटवर्धन यांनी महाराष्ट्रातील सर्व मंदिर व रस्त्यावर कीर्तने केली. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी मराठी लोकांना ब्रिटिश राज्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य शोधण्यास मदत केली. डॉ. पटवर्धनबुवा हे पहिले कीर्तनकार होते ज्यांनी राष्ट्रीय आणि ऐतिहासिक नायकांबद्दल उत्तररंग सादर केले. त्यांच्या नवीन परंपरेला ‘राष्ट्रीय कीर्तन’ असे म्हणतात आणि ती परंपरा आजही लोकप्रिय आहे. डॉ. दत्तोपंत पटवर्धनबुवा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे व्यक्ती होते आणि हे पुस्तक मराठी ऐतिहासिक अभ्यासाला चांगले योगदान देईल.
Rashtriya Keertankar Dr. Patwardhanbuva
Reviews
There are no reviews yet.