‘काळीज गोंदण’

Original price was: ₹ 200.00.Current price is: ₹ 160.00.

ज्येष्ठ पत्रकार आणि सध्या नाशिक ‘पुण्य नगरी’चे निवासी संपादक असणारे किरण लोखंडे यांचे ‘काळीज गोंदण’ हे त्यांच्या दैनंदिन जगण्याच्या परिप्रेक्ष्यातील अनेक माणसांच्या नियतीच्या गुंतागुंतीचे भेंडोळे आपल्यापुढे ठेवणारे आणि वाचकाला आपापल्या परीने विचार करायला, उकल करायला भाग पाडणारे आत्मबंध आहे. या पुस्तकातील सर्व माणसे, स्त्रिया-पुरुष लेखकाने साक्षात अनुभवलेली आहेत. म्हणजेच या कल्पनेतील कथा नाहीत.

498 in stock

पुस्तकाबद्दल

या पुस्तकातील सर्व भल्या-बुर्‍या माणसांचा लेखकाने घेतलेला अनुभव हा खूप रसरशीत आहे. प्रत्येक माणूस तादात्म्य संबंधातून लेखकाला कळला आहे. त्यामुळे लेखकाने साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा वाचकाला कवटाळून घेते… झपाटून टाकते, अस्वस्थ करते. लेखकाच्या विचार आणि चिंतन प्रक्रियेच्या समांतर वाचकाच्या विचारांचे चक्र फिरायला लागते. आपल्या अवतीभोवतीही आपण अशी माणसे बघत असतो, हे पुस्तक वाचताना वाचकाला आपल्या अनुभवाचे पुस्तक उघडावेसे वाटते.