आभास

Original price was: ₹ 200.00.Current price is: ₹ 160.00.

सौ. शिल्पा जैन यांचा प्रकाशित होणारा हा पहिला कथासंग्रह. समाजातील स्त्री मनाशी, त्यांच्या भावविश्वाशी जवळिक साधणारा हा कथासंग्रह आहे. समाजात रोज जे घडते, स्त्रियांना ज्या समस्यांना रोज सामोरे जावे लागते त्यांचे बारकाईने निरीक्षण करुन त्या समस्या, वेदना आपल्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने हृदयापासून केलेला बघावयास मिळतो. त्यामुळे या कथेतील नायिका लेखिकेच्या आजूबाजूला वावरणार्‍या, त्यांच्याशी मैत्री असलेल्या असाव्यात असा ठाम विश्वास निर्माण होतो.

496 in stock

पुस्तकाबद्दल

ह्या कथासंग्रहात अनाथाश्रमातून जीवनप्रवासाला सुरूवात करून शेवटी वृद्धाश्रमात दाखल झालेली सायली, निसर्गाच्या क्रूर चेष्टेने मातृत्व हरवून बसलेली अस्वस्थ दीपाली, पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंबाचे पालन करण्यासाठी नटी होण्याच्या नादात स्त्रीजीवनाचे सर्वस्व गमावून बसलेली देखणी माखी, प्रेमाच्या आभासाला बळी पडलेली चारूलता, नवर्‍याचा अधमपणा डोळ्यांनी पाहूनही नातिचरामि म्हणणारी स्मिता, मुलीचा जन्म नाकारणार्‍या विचाराचा बळी ठरलेली व तिची सासू असे का वागली? असा प्रश्न जिला भेडसावत आहे ती गीता, स्वत:च्या संसारातील अंधारासोबत समाजातील अंधार नष्ट करावयास सिद्ध झालेली स्वयंप्रभा उषा, समर्पण हा स्त्रियांचा निसर्गदत्त गुणधर्म आहे हे सांगणारी सीमा या कथानायिका सार्‍या स्त्रीजातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या आहेत.