पुस्तकाबद्दल
आई हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपण सर्वजण नऊ महिने आईच्या उदरात वाढतो. हे जग पाहण्यासाठी तिनेच आपल्याला जन्म दिला. तिच्या दुधावर देह पोसला. तिनेच आपल्याला चालायला, बोलायला शिकविले. तिने केलेल्या संस्कारावर या जगात उभे राहता आले. अशा या आईवर अनेक लेखकांना लिहिण्याचा मोह झाला. अनेक कवींनी आईवर न संपणार्या कविता लिहिल्या. तरीही नवीन लेखकांना आईच्या नव्या पैलूंचे दर्शन घडतेच.
Reviews
There are no reviews yet.