पुस्तकाबद्दल
समाजातील प्रतिकूल परिस्थितीतही माणसावर झालेले चांगले संस्कार त्याला असत्य, अन्याय, विपरित गोष्टींबद्दल लढायला कसे शिकवतात याचे चित्रण ‘चाल शिलेदार’ या किशोर कादंबरीत आले आहे. सुभाष कुदळे यांचे हे पाचवे पुस्तक. समाज बदलला पाहिजे हे सारेजण म्हणतात पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर कितीजण पुढे येतात? साठे आजोबा, राजू दादा यांच्यासारखी माणसे समाजात आहेत. ती रितेश, शुभम, हुसेन आणि ऊर्मिला या ‘चार शिलेदारां’च्या मागे उभी राहतात. म्हणूनच वयाने लहान असूनही समाज बदलण्याची आकांक्षा व त्यासाठी आपल्या परीने कष्ट घेण्याची तयारी असलेल्या या चार शिलेदारांची ही प्रेरक कथा.
Reviews
There are no reviews yet.