हे रामा

 150.00  120.00

साहित्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजमनाचा कानोसा घेतला आहे. केवळ कल्पनाविलासात न रमता वास्तवाला भिडणारी त्यांची कविता अनेकांचे डोळे उघडायला भाग पाडणारी आहे. थेट मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाला उद्देशून त्यांनी लिहिले आहे,
आमच्यापेक्षा जटायू बरा
त्यानं बलिदान दिलं तुझ्यासाठी!
आम्ही सोयीनं वापरतो तुला,
पत्त्यातल्या जोकरसारखं!
तुला डोक्यात न घेता
डोक्यावर घेऊन
आम्ही आमच्याच पायावर
कुर्‍हाड मारलीय!
प्रभू श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास गेलेले असताना अनंत कराड यांनी कोणत्या गोष्टी डोक्यात घ्यायच्या आणि कोणत्या डोक्यावर घ्यायच्या ते या संग्रहातून अधोरेखित केले आहे. समाजाविषयी आत्यंतिक कळवळा असलेल्या एका सशक्त कवीकडून यापेक्षा वेगळा जागर कोणता बरं असू शकेल?
घनश्याम पाटील
लेखक, संपादक आणि प्रकाशक

Buy now Read more