हे रामा

 150.00  75.00

साहित्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजमनाचा कानोसा घेतला आहे. केवळ कल्पनाविलासात न रमता वास्तवाला भिडणारी त्यांची कविता अनेकांचे डोळे उघडायला भाग पाडणारी आहे. थेट मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाला उद्देशून त्यांनी लिहिले आहे,
आमच्यापेक्षा जटायू बरा
त्यानं बलिदान दिलं तुझ्यासाठी!
आम्ही सोयीनं वापरतो तुला,
पत्त्यातल्या जोकरसारखं!
तुला डोक्यात न घेता
डोक्यावर घेऊन
आम्ही आमच्याच पायावर
कुर्‍हाड मारलीय!
प्रभू श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास गेलेले असताना अनंत कराड यांनी कोणत्या गोष्टी डोक्यात घ्यायच्या आणि कोणत्या डोक्यावर घ्यायच्या ते या संग्रहातून अधोरेखित केले आहे. समाजाविषयी आत्यंतिक कळवळा असलेल्या एका सशक्त कवीकडून यापेक्षा वेगळा जागर कोणता बरं असू शकेल?
घनश्याम पाटील
लेखक, संपादक आणि प्रकाशक

500 in stock

पुस्तकाबद्दल

पुण्या-मुंबईचा साहित्यिक केंद्रबिंदू ग्रामीण महाराष्ट्राकडे वळावा यासाठी जे मोजके लोक कारण ठरले त्यापैकी बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार येथील एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अनंत कराड आहेत. अनंतराव कराड हे उत्तम कवी, लेखक, समीक्षक आहेत. एकता फाउंडेशन आणि मराठवाडा साहित्य परिषद या संस्थांच्या माध्यमातून ते सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवत असतात. त्यांनी अनेक कवी-लेखकांना प्रोत्साहन दिल्याने मराठवाड्यात नव्याने लिहिणार्‍यांची एक सशक्त फळी तयार होतेय.
प्रस्तुतच्या कवितासंग्रहात त्यांनी इथल्या व्यवस्थेविषयी अत्यंत प्रामाणिक भाष्य केले आहे.

अधिक माहिती

कवी

अनंत कराड

पाने

112

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हे रामा”

Your email address will not be published. Required fields are marked *