लोकनायक सयाजीराव गायकवाड (ब्रेल)
₹ 480.00 Original price was: ₹ 480.00.₹ 384.00Current price is: ₹ 384.00.
गेल्या तीन-चार वर्षांपासून एक स्वप्न होतं. ब्रेल लिपीत पुस्तक करायचं! ‘अंधांना वाचक म्हणून गृहीतच धरलं जात नाही’ हे स्वागत थोरात सरांचं वाक्य मनावर आदळायचं. शेवटी ‘इंडियाना सुक्रो टेक’च्या प्रमोदकुमार बेलसरे सरांशी बोलणं झालं. अत्यंत सुहृदयतेनं त्यांनी हात पुढे केला आणि हे स्वप्न सत्यात अवतरलं.
यंदाच्या साहित्य संमेलनात चंद्रलेखा बेलसरे यांनी लिहिलेलं ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’ हे ‘चपराक’ने प्रकाशित केलेलं पुस्तक ब्रेलमध्ये लिप्यांतर होऊन दृष्टिहीन वाचकांसाठी उपलब्ध होतंय.
ही सुरुवात आहे. स्वागत थोरात सरांच्या सहकार्यानं अंधांचं ग्रंथालय लवकरच सुसज्ज करू याचा विश्वास आहे. ब्रेलच्या प्रती आज हाती आल्या आणि एक अनोखा उत्साह संचारला. स्वागत सर म्हणाले, “अनेकांना अंधांना ब्रेलमध्ये पुस्तकं भेट द्यायची इच्छा असते मात्र प्रकाशक ही पुस्तकं प्रकाशितच करत नाहीत. तुम्ही पुढाकार घेतला. त्यामुळे दानशूर मंडळींना आता आम्ही सांगू की ‘चपराक’शी संपर्क साधा.
या 125 पानांच्या पुस्तकाचं निर्मितीमूल्य 480 रुपये आहे. आपापल्या इच्छेप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे आपण पाच-दहा-वीस-पन्नास अंध शाळांना आपण आपल्यातर्फे हे पुस्तक भेट देऊ शकाल. निर्मितीमूल्याच्या रकमेतच आम्ही ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
ब्रेलमध्ये इतरही काही पुस्तके लवकरच भेटीला येतील. यात सहकार्य करण्यासाठी जरूर पुढाकार घ्या. आमचा संपर्क क्रमांक – 7057292092 (फक्त व्हाट्सअप)
-घनश्याम पाटील
Reviews
There are no reviews yet.