पाळंमुळं

 400.00  320.00

कोणत्याही वृक्षाची पाळंमुळं जितकी खोल तितका तो वृक्ष भक्कमपणे वादळवाऱ्यात उभा असतो. माणसाच्या आयुष्याचंही तसंच आहे. त्याच्या जीवनसंस्काराची, विचारांची पाळंमुळं जितकी खोल तितका तो माणूस भक्कमपणे समाजव्यवस्थेत उभा असतो. अशी पाळंमुळं भक्कमपणे रुजवून समाज आणि शासन अशा दोन्ही व्यवस्थेमध्ये लेखकाने अत्यंत निरपेक्षतेने काम करत शासकीय सेवा पूर्ण केली.

नानासाहेब खर्डे यांचे ‘पाळंमुळं’ हे पुस्तक निश्चितच एका कालखंडाचा इतिहास दर्शित करणारे आहे. संस्कार होण्यासाठी परिस्थिती असावी लागते असे नाही. जगण्यासाठी दोन हात करताना देखील घरातील ज्येष्ठांनी पेरलेल्या संस्काराच्या शिदोरीवर मस्तकाचे भरण होते. माणसं अधिक घट्टपणे पाय रोऊन उभे असतात. तो संघर्ष जगण्यासाठी ताकद देणारा असतो. त्या संघर्षामुळे जीवन उन्नतीचा विशाल महामार्ग सहजपणे एखाद्याला सापडून जातो. नानासाहेब खर्डे हे त्यापैकी एक आहेत.

Buy now Read more