पुस्तकाबद्दल
संगमनेरसारख्या छोट्याशा गावातील एखादा तरुण शासकीय सेवेत येतो, शासनाची सेवा प्रामाणिकपणे बजावतो आणि आपण ज्या कुटुंबातून आलो आहोत, ज्या व्यवस्थेतून आलो आहोत त्यांच्याप्रति कृतज्ञेचा भाव व्यक्त करत सातत्याने प्रामाणिकपणाची कास धरतो. खर्डे हे आमच्या विभागातील असे एक अधिकारी आहेत ज्यांनी सतत समाज व शासन यांच्या हिताचा विचार केला. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबर त्यातून अधिक अधिक समाजहित साधेल, त्यात राष्ट्रकल्याणाचा विचार असेल अशा संस्काराने हा माणूस कार्यरत राहिला.
त्यांनी शासकीय काम देखील गीतेतील संस्काराचा विचार करता कर्म म्हणूनच केले आहे. या पुस्तकामधील त्यांचा संघर्ष नव्या उमेदीने लढण्याची शक्ती देतो. जीवनामध्ये इप्रामाणिकपणाचे मूळ अधोरेखित करतो. जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य असे काहीच नाही हे सांगत वाचकांच्या मनात प्रेरणा निर्माण करतो. त्यामुळे हे पुस्तक जगण्याला उमेद देणारे, नव्या पिढीला संस्काराची शिदोरी देणारे, जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी सर्वांनाच उपयोगी पडणारे आहे.
– डॉ. इंजि. श्री. संजय बेलसरे
सचिव, जलसंपदा खाते, महाराष्ट्र राज्य, मुंबई
Reviews
There are no reviews yet.