फुलताना

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 175.00.

शिक्षण ही समजून उमजून करावयाची कृती/प्रक्रिया आहे, हे तत्त्व ज्या शिक्षकांना नीट उमगलेलं आहे भरत पाटील हे त्यापैकी एक गुणी, प्रयोगशील, संवेदनशील शिक्षक आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शिक्षणाची धोरणं राबवली गेली. त्यातलं एक महत्त्वाचं तत्त्व होतं की, शिक्षणप्रक्रिया शाळेबाहेरील जगाशी जोडायला हवी. मुलांचं जगणं आणि शिकणं याचं नातं अधोरेखित करणारा अभ्यासक्रम आराखडा होता. भरत पाटील यांनी शिक्षणशास्त्रीय सिद्धांत आणि तत्त्व याची नीटपणाने सांगड घालत डोळसपणाने शिक्षणाचे काम करताना जे अनुभव आले ते ‘फुलताना’ या पुस्तकात मांडले आहेत.

आमचे शिक्षण मुलांना त्रिकोणाचे, चौकोनाचे प्रकार शिकवते परंतु सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये दृष्टिकोन हरवलेला आहे. त्या दृष्टिकोनावर काम करणारे जे शिक्षक आहेत त्यात भरत पाटील यांचा वरचा क्रमांक आहे. चांगल्या गोष्टी आपसूक घडत नाहीत तर त्या घडवून आणाव्या लागतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. भरत पाटील साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांमधला एक मुलगा आहे. त्यांच्यासारख्या धडपड्या वृत्तीच्या शिक्षकांमुळे शिक्षणामध्ये तरुण पिढी वेगवेगळे प्रयोग, उपक्रम राबवत आहे. माझ्या शाळेतल्या, माझ्या वर्गातल्या सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे, त्याचसोबत जीवन कौशल्यांच्या अंगाने सहज संस्कार असे काही धडे मिळायला हवेत अशा प्रकारचे अंगीकृत प्रयत्न भरत पाटील करत आहेत.

500 in stock

पुस्तकाबद्दल

विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सगळ्यांनीच हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. आपल्याकडे आजवर सरकारी शाळांमध्ये शिक्षक कोणते प्रयोग राबवत होते, कोणत्या प्रकारच्या अनुभवांचा वापर करून उपक्रम आखत होते, विद्यार्थी विकासासाठी काय-  प्रयत्न करत होते याचे दस्तऐवजीकरण फारसे झालेले दिसत नाही. भरत पाटील यांच्यासारख्या शिक्षकाने हे अनुभव कृतिशीलतेत आणले आहेत, ही आश्वासक गोष्ट आहे. त्यातून इतरांनाही प्रेरणा, प्रोत्साहन आणि शिकवण मिळेल अशा अपेक्षा !

– भाऊसाहेब चासकर

अधिक माहिती

लेखक

भारत पाटील

पाने

१ ४ ४

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फुलताना”

Your email address will not be published. Required fields are marked *