अधिक माहिती
लेखक | हिरालाल पगडाल |
---|---|
पाने | 80 |
Publisher |
Original price was: ₹ 150.00.₹ 120.00Current price is: ₹ 120.00.
एकेकाळी विदेशात जाणं ही फार मोठी गोष्ट वाटायची. आजच्या काळात हे सहजशक्य झाल्यानं त्याचं अप्रूप कमी झालंय. महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यात पारावर गप्पा मारताना मनात यावं आणि सहज पुण्या-मुंबईला निघून जावं तितक्या सहजपणे लोक अनेक देशात ये-जा करतात. विदेशात गेल्यावर काय पाहावं काय अनुभवावं हा मात्र ज्याच्या त्याच्या दृष्टिचा विषय असतो.
हिरालाल पगडाल यांनी युरोपचा दौरा केला. त्यात निसर्ग बघितला, माणसे अनुभवली, खाद्य संस्कृतीचा अनुभव घेतला. जे जे चांगलं आहे ते वेचत गेल्यानं वैश्विक सुख त्यांच्या वाट्याला आलं. उघड्या डोळ्यांनी जग कसं पाहावं, याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. मुळातच शिक्षक आणि लेखक असल्यानं त्यांचं अनुभवविश्व समृद्ध आहे. आपण अनुभवलेल्यापैकी वाचकांना काय सांगावं याचं भान त्यांना आहे. त्यामुळे मुद्देसूदपणे आणि चित्रदर्शी शैलीत त्यांनी लंडन आणि अर्थातच युरोपचं मनोहारी वर्णन केलं आहे. या पुस्तकाच्या तास-दोन तासाच्या वाचनातून आपलीही युरोपची भन्नाट सहल घडेल. या अनुभूतीशिवाय वाचक म्हणून आपल्याला आणखी काय हवंय ?
घनश्याम पाटील
500 in stock
Reviews
There are no reviews yet.