Sale!

रॅगिंगचे दिवस

 250.00  200.00

दुर्बलता आणि दुय्यमता आली की कुणाची तरी दादागिरी ही आलीच! या दादागिरीतून वर्चस्ववाद निर्माण केला जातो. आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत आणि समोरच्या कनिष्ठांनी आपण सांगेल त्या पद्धतीनेच वागायला, राहायला हवे या मानसिकतेतून अन्याय-अत्याचाराचा जन्म होतो. यातून निर्माण झालेली विषमता अनेकांना आयुष्यातून उठवते, काहींना कणखरही बनवते.
महाविद्यालयीन जीवन म्हणजे तर मोरपंखी दिवस. तारुण्याची चाहूल लागलेली असते. भावी आयुष्याची गुलाबी स्वप्ने रंगवली जातात. या काळात रॅगिंगसारख्या क्रूर प्रकाराला सामोरे जावे लागल्यास त्याचे ओरखडे मनावर कायमस्वरूपी उमटतात. यातून काही दुर्दैवी घटना घडल्याचेही आपण वेळोवेळी पाहिले, ऐकले आहे.

973 in stock

पुस्तकाबद्दल

सुहास कोळेकर या संवेदनशील मित्राने नागपूरच्या वास्तव्यात असे काही अनुभव घेतले. ज्येष्ठांची मुजोरशाही आणि प्रांतिक अहंगंडातून चालवलेली छळछावणी यामुळे ते खचले नाहीत. गरिबीच्या डोंगराला सुरुंग लावून भवितव्य घडवायचे तर सगळे हलाहल सहन करून स्वतःला सिद्ध करावे लागेल हे त्यांना परिस्थितीने शिकवले. त्यामुळे या सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडत त्यांनी त्यांचे सामर्थ्य दाखवून दिले.
त्यांचे हे जीवनानुभव आपल्यालाही प्रतिकूलतेवर मात करण्यास बळ देतील. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील काही कटू-गोड आठवणी जाग्या करतील. वयाने चाळीशीच्या पुढील प्रत्येकाला पुन्हा एकदा ‘तरूण’ करणारे आणि तारूण्यात प्रवेश करणाऱ्यांना नवी उमेद, बळ देणारे हे ‘रॅगिंगचे दिवस’ आपण वाचनाच्या माध्यमातून अनुभवायलाच हवेत.

– घनश्याम पाटील

अधिक माहिती

लेखक

सुहास कोळेकर

पाने

128

Publisher

Chaprak Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रॅगिंगचे दिवस”

Your email address will not be published. Required fields are marked *