सर्जक

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 200.00.

आज जगाच्या पाठीवर भारत हा सर्वाधिक तरुण असलेला देश आहे. अशा तरुणांच्या देशातील मयूर बागुल नावाचा एखादा तरूण भोवतालचे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी भोवताल पाहिला की त्यांना प्रश्न पडतात. त्या प्रश्नांच्या भोवतीचे चिंतन करत काही लिहावे वाटते आणि त्यातून सर्जकचा जन्म होतो. खरंतर प्रश्न पडणे हाच स्वतःला समृद्ध करण्याचा एकमेव मार्ग आहे. आपला भोवताल उघड्या डोळ्याने पाहिला तर मूलभूत प्रश्न देखील सुटलेले नाहीत, हे वास्तव समोर येते. त्याबद्दल बागूल अनेक ठिकाणी चिंता व्यक्त करतात.त्यांच्या लेखनातून समाजशास्त्रीय दृष्टीकोनही अनेक ठिकाणी प्रतिबिंबीत होतो. आपण सर्वांनी एकत्रित येत विकासाचा आलेख उंचवायला हवा ही अपेक्षा त्यांचे माणूसपणाचे दर्शन घडवते.

889 in stock

पुस्तकाबद्दल

बागुल यांच्या लेखनात स्वतःपेक्षा समाज आणि राष्ट्र अग्रभागी असल्याचे दिसते. समाजातील वेदनांचा हुंकार संपुष्टात यावा, अवध्या जगाने आनंदाच्या लाटेबर स्वार व्हावे, नव्या तंत्रज्ञानाशी जोडताना आनंद हरवला आहे. जीवनात झालेली स्थित्यंतरे अचूकतेने नोंदवण्याबरोबर आपण काय मिळवले आणि काय गमावले याचा हिशोबही ते मांडतात. अवघं जग अत्यत सुंदर घडावं असं स्वप्न एखादा तरुण पाहतो. त्यासाठी अहोरात्र धडपड करत आपला प्रवास सुरू ठेवतो, प्रश्न आहेत म्हणून माघारी न फिरता आपल्या परीने त्यावर मात करण्यासाठीची पाऊलवाट निर्माण करतो, त्या वाटेचा पांथस्थ म्हणून मयूर बागुल आणि त्यांचा प्रवास महत्त्वाचा आहे. आज निराशेच्या छायेत असलेल्या कोणत्याही तरुणाला बागुलांचे सर्जक मस्तकात प्रेरणा भरेल. हा चिंतनशीलतेचा प्रवास उद्याची पहाट अधिक प्रकाशमय करेल आणि अवचं जग उजळून निघेल. ही सर्जनाची वाट प्रत्येक तरुण मनाच्या वाचकाने वाचायलाच हवी.

संदीप वाकचौरे,

सदस्य, राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समिती