सावट

Original price was: ₹ 250.00.Current price is: ₹ 200.00.

कोरोना वरील अन्टिबायोटिक* *लस!*
स.न.वि.वि.
     ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ ना‌.माटल यांनी लिहिलेला “सावट” कथासंग्रह पुण्यातील ‘चपराक’ प्रकाशन‌ संस्थेचे प्रकाशक ज्येष्ठ पत्रकार घनश्याम पाटील प्रकाशन करीत आहेत.या घटनेचे स्वागत करावे तेवढे थोडेच आहे! उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्याचे समन्वयक उमरग्याचे विजय (काका) श्रीधरराव जाधव
यांनी करोना काळात एका भांडीविक्री करणाऱ्या विधवा महिलेला तिच्या दोन मुलांसह दत्तक घेतले.ही घटना त्यावेळी संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात प्रेरणादायी ठरली.
श्री विजय (काका) जाधव धराशिव जिल्हा समन्वयक म्हणून “साऊ एकल महिला पुनर्वसन समिती,महाराष्ट्र शाखे’द्वारे महिला कल्याणाचे काम हिरीरीने करीत आहेत.अशा निरलस सेवेच्या भावनेतून काम करणाऱ्या व्यक्ती कडून दत्तक घेण्याची प्रक्रिया घडत आहे.त्यामुळे या घटने भोवती उदात्त भावनेची गुंफण विणली गेली आहे. अशा या घटनेवर लेखक काशिनाथ माटल यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून “नियती” काथा लिहिली आहे.वास्तवाचे भान ठेवून लिहिलेली ही कथा सामन्य वाचकांना भावून गेली आहे.माझ्या धाराशिव लोकसभा मतदार संघाला ही घटना निश्चितच अभिमान वाटावा अशी आहे!त्या बद्दल ज्येष्ठ लेखक काशिनाथ माटल यांचे मी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे.

500 in stock

पुस्तकाबद्दल

सबंध कोरोना काळ श्वास रोखून ठेवणारा भिती दायक,शंभर वर्षे मागे नेणारा आणि जगण्यावरील उमेद प्रश्नांकीत करणारा असा होता!काशिनाथ माटल यांनी अत्यंत तन्मयतेने, समरसून त्या काळातील घटना सर्वच कथांमथून‌‌ संजीव केल्या आहेत. शेवट पर्यंत उत्कंठा ताणून धरणा-या आणि प्रसंगावर मात करण्याचे बळ देणा-या, या कथा आहेत.कोरोना काळ खूप मागे पडला आहे.तरी ‘जागतिक आरोग्य संघटने’ने तो पुन्हा कधीही मानवाच्या शरीरात डोकावीव‌,असे भाकीत केले आहे.तेव्हा हा ‘सावट“कथासंग्रह म्हणजे भविष्यात ‘कोरोना’वर  अन्टिबायोटिक लस्सीचे काम करीत राहिल,यात मला शंका वाटत नाही.त्यासाठी प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रकाशनाचे उचलले पाऊल आणि त्यांना जाधव काकांनी केलेले सहकार्य काळाच्या खूना उमटवून जातील हे नक्की ! माझ्या “सावट” कथासंग्रहाला शुभेच्छा!
-ओमराजे निंबाळकर,खासदार- धाराशिव