शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर

 120.00  96.00

आपण ही कविता वाचली, ऐकली अनेकदा पण आपल्याला हे कसं लक्षात आलं नाही? अशा ठिकाणी सुनील आपल्याला घेऊन जातात. कविता गीत-गाणं यात भेद करणारे, श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवणारे ही प्रातिनिधिक कविता जरा पुन्हा पुन्हा वाचावी, ऐकावी. या कालखंडातल्या श्रेष्ठ अशा चांगल्या कवींनी ही रेखा पुसून टाकलेली आहे.
– ना. धों. महानोर
(प्रस्तावनेतून)

494 in stock

पुस्तकाबद्दल

साधारणत: 1930 ते 1990 असा अधोरेखित करून माझे मित्र सुनील शिनखेडे यांनी ‘हिंदोळ्यावर’ सगळ्यांना बसवून फार मोठं सांस्कृतिक काम केलेलं आहे. त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. त्यांचा पिंड कवीचा. सबंध साहित्य कला – संस्कृती – संगीत यावर त्यांचं नितांत प्रेम असल्यामुळेच त्यांनी वेळोवेळी वृत्तपत्रातून ठळकपणानं कवी, त्याची एखादी कविता, ती संगीतबद्ध असेल तर त्यातले बारकावे, गायक-गायिका आणखी खूप काही चिंतन असं त्याचं स्वरूप आहे. ते वरवरचं नाही. खोलवर त्या कवीच्या कवितेच्या आत तळघरात जाऊन ते शोधलं आणि मन:पूर्वक त्यासाठी लिहित राहिले. एकतर या कवितांची, गीतांची निवड ही अस्सल भावकवितेकडे जाणार्‍या श्रेष्ठ अशा कवितेची आहे. ती कविता – तो कवी, त्या काळातले संदर्भ हे बारीकबारीक तपशीलासह आणि सहज बोलावे असे सोप्या शब्दात लिहिलेले आहे.
– ना. धों. महानोर
(प्रस्तावनेतून)

अधिक माहिती

लेखक

सुनील शिनखेडे

पाने

80

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर”

Your email address will not be published. Required fields are marked *