₹ 250.00 ₹ 200.00
पूर्वनोंदणी सुरु! १२ मार्च २०२४ पासून उपलब्ध.
संदीपजींनी कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानाची व शिक्षण विषयक विचारांची ओळख त्यांच्या नेहमीच्या साध्या सोप्या भाषेत या पुस्तकाद्वारे करून दिलेली आहे. पुस्तकाच्या अगदी सुरुवातीच्या भागातच ज्ञान म्हणजे काय याचा सविस्तर उहापोह केलेला आहे. कृष्णमूर्ती ज्ञानाचे विविध मार्ग दाखवितात. आपण मात्र केवळ भूतकालीन घटनांच्या ज्ञानालाच ज्ञान म्हणतो आहोत किंवा पुस्तकात साठविलेल्या माहितीलाच ज्ञान समजून शाळा महाविद्यालयातून अशी पुस्तके शिकवण्याचा उद्योग सुरू ठेवलेला आहे. वास्तविक ज्ञानाचा प्रस्फोट होत आहे हे म्हणतानाच हे ज्ञान मिळण्याचे देखील विविध मार्ग उपलब्ध होत आहेत याकडे आपण फार गंभीरपणे पाहत नाही हेच खरे! आपल्या आजूबाजूचा परिसर व त्यामध्ये घडणाऱ्या घटना ,त्यांचे परस्पर संबंध, त्यांचे कार्यकारण भाव, समजून घेणे हे देखील महत्वपूर्ण ज्ञान होय याबाबत आपण फार सजग नाही. कुतुहूल व जिज्ञासा या जन्मजात प्रवृत्ती या आपसूकच ज्ञानग्रहण करण्यासाठी आपणास उद्युक्त करीत असतात . परंतु असा प्रश्न पडतो की ज्ञानग्रहण तरी कशासाठी, आपण आपल्या अस्तित्वासाठी ज्ञानग्रहण करतो असे मान्य केले तर पुढचा प्रश्न असा पडतो की आपण जगतो कशासाठी किंवा आपले अस्तित्व कशासाठी आहे अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे हेच खरे ज्ञान. परंतु यांचा अर्थ मी जसा अर्थ शोधतो किंवा शिक्षण घेतो तोच मार्ग योग्य असे समजणे हा अहंकार होय. या अहंकारापासून मुक्ती मिळवणे आवश्यक असते.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed