शोध शिक्षणाचा

 250.00  200.00

पूर्वनोंदणी सुरु! १२ मार्च २०२४ पासून उपलब्ध.

संदीपजींनी कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानाची व शिक्षण विषयक विचारांची ओळख त्यांच्या नेहमीच्या साध्या सोप्या भाषेत या पुस्तकाद्वारे करून दिलेली आहे. पुस्तकाच्या अगदी सुरुवातीच्या भागातच ज्ञान म्हणजे काय याचा सविस्तर उहापोह केलेला आहे. कृष्णमूर्ती ज्ञानाचे विविध मार्ग दाखवितात. आपण मात्र केवळ भूतकालीन घटनांच्या ज्ञानालाच ज्ञान म्हणतो आहोत किंवा पुस्तकात साठविलेल्या माहितीलाच ज्ञान समजून शाळा महाविद्यालयातून अशी पुस्तके शिकवण्याचा उद्योग सुरू ठेवलेला आहे. वास्तविक ज्ञानाचा प्रस्फोट होत आहे हे म्हणतानाच हे ज्ञान मिळण्याचे देखील विविध मार्ग उपलब्ध होत आहेत याकडे आपण फार गंभीरपणे पाहत नाही हेच खरे! आपल्या आजूबाजूचा परिसर व त्यामध्ये घडणाऱ्या घटना ,त्यांचे परस्पर संबंध, त्यांचे कार्यकारण भाव, समजून घेणे हे देखील महत्वपूर्ण ज्ञान होय याबाबत आपण फार सजग नाही. कुतुहूल व जिज्ञासा या जन्मजात प्रवृत्ती या आपसूकच ज्ञानग्रहण करण्यासाठी आपणास उद्युक्त करीत असतात . परंतु असा प्रश्न पडतो की ज्ञानग्रहण तरी कशासाठी, आपण आपल्या अस्तित्वासाठी ज्ञानग्रहण करतो असे मान्य केले तर पुढचा प्रश्न असा पडतो की आपण जगतो कशासाठी किंवा आपले अस्तित्व कशासाठी आहे अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे हेच खरे ज्ञान. परंतु यांचा अर्थ मी जसा अर्थ शोधतो किंवा शिक्षण घेतो तोच मार्ग योग्य असे समजणे हा अहंकार होय. या अहंकारापासून मुक्ती मिळवणे आवश्यक असते.

955 in stock

पुस्तकाबद्दल

अहिसा, शांतता व स्वातंत्र्य हीच खऱ्या अर्थाने मानव म्हणून जगण्यासाठीची आवश्यक मूल्ये आहेत. ‘शिक्षण संस्थांचे व्यावसायिकीकरण झाले की शिक्षणाचा मूळ उद्देशच रसातळाला जातो’ हे कृष्णमूर्तींचे त्यावेळचे विचार आजच्या परिस्थितीला किती चपखलपणे लागू पडतात हे नव्याने सांगायला नको. शिक्षणाच्या दर्जाच्या मापनाविषयी देखील कृष्णमूर्ती आपला आक्षेप नोंदवतात ते म्हणतात, “आपल्याकडे विविध प्रकारची विषमता आणि असमानता असताना केवळ विद्यापीठांच्या परीक्षेतील यशावरून गुणवत्ता मोजली जाते हे अयोग्य आहे. शिक्षणव्यवस्थेची गुणवत्ता ही केवळ भौतिक सुविधा व परीक्षेतील गुण या
भोवतीच घोटाळत राहते हे योग्य नव्हे.” कृष्णमूर्तींच्या स्वातंत्र्य कल्पनेचा विस्तार करताना संदीपजी अगदी अलीकडील यंत्र युगातील व संगणक युगातील उदाहरणे देतात व खरे स्वातंत्र्य म्हणजे काय हे स्पष्ट करतात . ज्या स्वातंत्र्यात प्रेम आणि प्रज्ञांचा विचार आहे ते खरे स्वातंत्र्य आपणास प्रज्ञाची वाट हवी असेल तर त्यासाठी सत्याची वाट धरावी लागेल सध्याच्या स्पर्धेच्या काळात सातत्याने असे म्हटले जाते की स्पर्धे शिवाय प्रगती होत नाही परंतु या उलट किंवा या स्पर्धेबाबत कृष्णमूर्ती वेगळा विचार मांडतात ते म्हणतात, “विविध प्रकारच्या विषमतेने भरलेल्या या जगात स्पर्धा कोणी कोणाशी व कशासाठी करायची हे निश्चित व्हायला हवे .मुळात ही स्पर्धा का करायची याचे भानही ठेवायला हवे .अन्यथा स्पर्धा हे दुःखाचे फार मोठे कारण बनण्याची शक्यता असते . शिक्षणातून आपल्याला माणूस घडवायचा आहे .शिकलेला माणूस आनंदी असायला हवा .शिक्षण हे आनंद निर्माण करण्यासाठीच असायला हवे. एकमेकांशी तुलना ही कधीच सुख समाधान आणि आनंद देऊ शकणार नाही.”
कृष्णमूर्तीच्या शिक्षण विषयक तत्त्वज्ञानाचा आढावा अत्यंत सुबोध व सुलभ भाषेत आणि मोजक्या पृष्ठांमध्ये सामावण्याचा अत्यंत अभिनंदनीय व यशस्वी प्रयत्न संदीपजींनी केला आहे . हा ग्रंथ शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने व शिक्षण प्रेमींनी अत्यंत गंभीरतेने वाचावा असा आहे . या ग्रंथ निर्मिती बद्दल त्यांचे पुनश्च: अभिनंदन !

– डॉ. ह.ना.जगताप

अधिक माहिती

लेखक

संदीप वाकचौरे

पाने

152

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोध शिक्षणाचा”

Your email address will not be published. Required fields are marked *