सुभावभजन

 350.00  280.00

‘सुभावभजन’ म्हणजे विशुद्ध भावाने केलेले भजन! विशुद्ध भाव निर्माण होण्यासाठी संतपदाला जावं लागतं. आजच्या काळात सर्व क्षेत्राची इतकी अधोगती झालीय की, कोणीही कुणावर पटकन विश्वास ठेवत नाही. सर्वच धर्मातील अनेक धर्मगुरुंनीही त्यांची विश्वासार्हता गमावली आहे. अशा परिस्थितीत ह. भ. प. शांताराम महाराज निम्हण यांच्यासारखे कलियुगातील संत आकाशाचे खांब बनून समाजगाडा सुरळीत राहील याची दक्षता घेतात. कर्मकांडं किंवा बुवाबाजीच्या मागे न लागता विशुद्ध भावाने भजनात एकरूप होत समर्पित आयुष्य जगणार्‍या शांताराम महाराज अर्थात अण्णांची अमृतमहोत्सवी वाटचाल या गौरगग्रंथात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध मान्यवरांनी अत्यंत आत्मियतेने लिहिलेल्या या लेखातून वारकरी संप्रदायाची पताका आणखी डौलात फडकणार आहे. त्याचबरोबर आपल्या मनात प्रेरणेचे, मांगल्याचे, चैतन्याचे दीप प्रज्वलित होणार आहेत. त्यासाठीचे हे सुभावभजन!

Buy now Read more