विनोदाचा व्हेंटिलेटर

 200.00  160.00

सर्वत्र प्रादेशिक, भाषिक, जातीय, धार्मिक अस्मिता टोकदार होऊन समाजमन कलुषित होत असताना फक्त मनाचा खेळकरपणा हा या सार्वत्रिक होत जाणार्‍या विकृतीवर रामबाण औषध ठरू शकतो, यावर श्रद्घा असलेल्या डॉ. आनंद देशपांडे यांनी तमाम मराठी वाचकांच्या सुदृढ मनासाठी ‘विनोदाचा व्हेंटिलेटर’ सुरू केला आहे. हा ‘आनंदा’चा व्हेंटिलेटर असल्याने यातून समाजमनाला उभारी मिळणार आहे. कमालीचे क्रौर्य, कपट, कट्टरतावाद अशा कटकारस्थानापासून स्वतःला वाचवायचे तर या ‘विनोदाच्या व्हेंटिलेटर’ला पर्याय नाही.

1000 in stock

पुस्तकाबद्दल

विनोद हा आनंदी जीवनाचा राजमार्ग आहे. आपल्या मनातील नैराश्य, आलेली मरगळ आणि मळभ दूर सारायचे असेल तर नकारात्मकता संपवून आव्हानांना सामोरे जायला हवे. आपण आनंदी, प्रसन्न राहिलो तरच ते शक्य होणार आहे. त्यासाठीची ‘गुटी’ म्हणून या पुस्तकाची मदत होऊ शकते. मराठी साहित्यातून ‘विनोदी लेखन’ हद्दपार होत असताना आनंद देशपांडे यांनी या पुस्तकातील लेखातून जी शब्दपेरणी केलीय ती आपल्या जीवनात टवटवीतपणा आणण्याबरोबरच आपल्याला उभारी देणारीही आहे. लेखकाच्या मनाची निकोपता आणि त्यांच्याकडे माणूस म्हणून मुळातच असलेले चांगुलपण यामुळे असं मार्मिक लिहिता येत असावं. शारीरिक व्यंग, अश्लिलता, महिलांचा अनादर अशा कशाचाही आधार न घेता सर्वोच्च दर्जाची विनोदनिर्मिती करता येऊ शकते, हे डॉ. देशपांडे यांनी या पुस्तकातून सिद्ध केले आहे.

अधिक माहिती

लेखक

आनंद देशपांडे

पाने

112

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विनोदाचा व्हेंटिलेटर”

Your email address will not be published. Required fields are marked *