पुस्तकाबद्दल
‘भारत-आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष’ हा एक ज्ञानपट आहे. यात वेळोवेळी भारतावर झालेली आक्रमणे, नकाशा यासह माहिती आहे. त्याचबरोबर त्या आक्रमणाच्या विरोधात स्वातंत्र्ययोद्ध्यांनी केलेलेे संघर्ष व त्यांना मिळालेले विजय नकाशे व माहितीच्या टिपणासह दाखविलेले आहेत. असे स्वातंत्र्यसंघर्ष प्राचीन काळी चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, पुष्यमित्र, गौतमीपुत्र सातकर्णी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, यशोधर्मन यांनी यवन, शक, हूण इत्यादींच्या आक्रमणाविरूद्ध केले. मध्य काळात बप्पा रावळ, धंग चंदेल, हरीहर बुक्का, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंह यांनी तुर्क व मुघलाविरुद्ध स्वातंत्र्यसंघर्ष केले. अर्वाचीन काळी महादजी शिंदे, इब्राहीम गार्दी, हैदरअली, रण्जितसिंह, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांच्या आक्रमक सत्तेविरूद्ध संघर्ष केले. याशिवाय असंख्य देशभक्तांनी हौतात्म्य पत्करले आहे. या पुस्तकात विजयी सम्राटांच्या राज्यविस्ताराबरोबरच त्यांच्या काळातील संस्मरणीय सांस्कृतिक घटना व प्रगती यांची पण नोंद घेतलेली आहे.
Reviews
There are no reviews yet.