पुस्तकाबद्दल
विनोद हा आनंदी जीवनाचा राजमार्ग आहे. आपल्या मनातील नैराश्य, आलेली मरगळ आणि मळभ दूर सारायचे असेल तर नकारात्मकता संपवून आव्हानांना सामोरे जायला हवे. आपण आनंदी, प्रसन्न राहिलो तरच ते शक्य होणार आहे. त्यासाठीची ‘गुटी’ म्हणून या पुस्तकाची मदत होऊ शकते. मराठी साहित्यातून ‘विनोदी लेखन’ हद्दपार होत असताना आनंद देशपांडे यांनी या पुस्तकातील लेखातून जी शब्दपेरणी केलीय ती आपल्या जीवनात टवटवीतपणा आणण्याबरोबरच आपल्याला उभारी देणारीही आहे. लेखकाच्या मनाची निकोपता आणि त्यांच्याकडे माणूस म्हणून मुळातच असलेले चांगुलपण यामुळे असं मार्मिक लिहिता येत असावं. शारीरिक व्यंग, अश्लिलता, महिलांचा अनादर अशा कशाचाही आधार न घेता सर्वोच्च दर्जाची विनोदनिर्मिती करता येऊ शकते, हे डॉ. देशपांडे यांनी या पुस्तकातून सिद्ध केले आहे.
Reviews
There are no reviews yet.