पुस्तकाबद्दल
अनेक अद्भूत, गूढ गोष्टींचे मानवी मनाला कुतुहल असते. ‘मृत्युनंतरचे जग’ हाही अनेकांच्या अभ्यासाचा विषय असतो. त्यामुळेच जागतिक स्तरावर या विषयावर विपुल साहित्यलेखन झाले आहे. मराठी मनात तर अशा शक्तीविषयी मोठी जिज्ञासा आहे. चंद्रलेखा बेलसरे या गेल्या अनेक वर्षांपासून विविध मासिकातून, दिवाळी अंकातून त्या सातत्याने अशा विषयावर लेखन करत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या कथा तळागाळातील अनेकांच्या मनाचा ठाव घेतात. आपल्या कथेतून मानवी मनाचे, व्यवहाराचे अनेक पदर उलगडून दाखवताना सत्प्रवृत्तीचा विजय हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. म्हणूनच ‘पाठलाग’ हा कथासंग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरेल याची खातरी आहे.
Reviews
There are no reviews yet.