पुस्तकाबद्दल
महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानणाऱ्या डॉक्टर देगलूरकर यांनी अक्षरशः शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलं. अतिशय प्रतिकूलतेतून शिक्षण पूर्ण करत ते वडार समाजातील पहिले सिव्हिल सर्जन ठरले. हजारो रुग्णांना त्यांनी जीवदान दिलंच पण दलित, वंचित, उपेक्षित समाजाच्या भल्याचाच विचार कायम केला. वडार समाजाचे संघटन करून काही भरीव काम करावे, या हेतूने त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. ‘स्वार्था’चा विचार न करता ज्यांना ‘स्व’ अर्थ उलगडला अशा अपवादात्मक आदर्शांपैकी ते एक होते. हे आत्मचरित्र अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेरेल आणि ज्यांच्या आयुष्यात नैराश्याचे मळभ दाटून आले आहे त्यांच्यातील प्रेरणेची ज्योत तेवत ठेवेल.
– घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक
Reviews
There are no reviews yet.