पुस्तकाबद्दल
प्रेक्षागृहातले दिवे हळूहळू मालवतात आणि समोरचा रूपेरी पडदा उजळून निघतो. सुरू होतो दोन-अडीच तासांचा अद्भुत प्रवास – सिनेमा नावाचा! डोळे, कान या पंचेंद्रियांसह डोक्यालाही बराच खुराक देणारा… कधी मनोरंजन करणारा, तर कधी आपलं जगणं, आपलं असणंच अंतर्बाह्य हलवून टाकणारा… सिनेमा हे आपल्या सर्वांचं वेड आहे; कारण आपल्या रक्तातच ही कला आहे. अशा या सिनेमाची परीक्षणं वृत्तपत्रातून खास आवडीनं वाचली जाणारी. अशाच काही निवडक परीक्षणांचा हा 70 एमएम अविष्कार…
फर्स्ट डे फर्स्ट शो
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, लेखक-पत्रकार श्रीपाद ब्रह्मे यांच्या लेखणीतून अवतरलेली रूपेरी दुनिया आणि तिचं अंतरंग जाणून घ्यायचं, तर हा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहिल्याशिवाय, वाचल्याशिवाय पर्याय नाही.
Reviews
There are no reviews yet.