पुस्तकाबद्दल
मृत्युनंतरचं जग हे अनेकांसाठी उत्कंठावर्धक असतं. माणूस शरीराने नष्ट झाल्यावर त्याचं काय होतं? भूत, आत्मा, पुनर्जन्म असं काही असतं का? यावर जगभर संशोधन सुरू आहे. या विषयावर अनेक चित्रपट आले, मालिका आल्या, वेबसिरीज आल्या. जगात कुठेही गेलात तरी यावर चर्चा होतच असते.
सौ. चंद्रलेखा जगताप-बेलसरे या मराठीतील आघाडीच्या कथाकार आहेत. कविता क्षेत्रातही त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या भयकथा, गूढ कथा विविध नियतकालिकातून प्रकाशित होत असतात. यापूर्वी या विषयावर त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाले आहेत आणि आणखी डझनभर तरी प्रतीक्षेत आहेत. नेहमीच्या कटकटीपासून वाचकांना एका वेगळ्या आणि भारावलेल्या विश्वात नेण्याचं अफाट कसब त्यांच्या लेखणीत आहे.
मुख्य म्हणजे त्यांच्या कथांतील भूतं ‘माणसासारखी’ बेभरोशी, विश्वासघातकी, क्रूर, फसवे, वासनेने-विकृतीने वखवखलेले नाहीत. काही अत्याचारांना, दुर्दैवी घटकांना ते बळी पडले. आपल्याबाबत जे अघटित, आक्रित घडलं त्यामुळे न्याय मिळवण्याची धडपड त्यांनी केली. नियतिच्या न्यायालयात कुणालाही माफी नसते. या ‘भूतांनी’ तर आपले प्राण गमावलेले आहेत. एखाद्या स्वार्थापोटील संबंधिताचे आयुष्य कसे बेचिराख होऊ शकते आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाची कशी वाताहत होते हे बेलसरे यांच्या अनेक कथांतून येते. यातून आपण काही बोध घेतला तर आणि तरच आपणास माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार उरेल.
-घनश्याम पाटील
Reviews
There are no reviews yet.