पुस्तकाबद्दल
इतिहासात युगपुरूष राजे एकच, छत्रपती शिवाजीराजे! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी मरगळलेल्या समाजात चैतन्य पेरले. गुलामीच्या शृंखला झुगारून देतानाच त्यांनी सामान्य माणसात स्वाभिमानाचे बीज पेरले. या स्वराज्याच्या कामात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले ते सर्व पे्ररणेचे दीपच! इतिहासात प्रत्येकाची सविस्तर दखल घेणे शक्य होत नसले तरी त्यामुळे त्यांचे कर्तृत्व थिटे ठरत नाही. अशाच एका वीर योद्ध्याची गाथा म्हणजे हे छोटेखानी पुस्तक. छत्रपती शिवाजीराजांच्या एका शब्दावर एक भला मोठा खडक फोडून बांध बांधण्यास हातभार लावणार्या वीर येसाजी कामठे यांचा अल्पपरिचय करून दिलाय याच घराण्यातील सध्याचे आघाडीचे लेखक रविंद्र कामठे यांनी!
Reviews
There are no reviews yet.