चिन्नण्णा

 400.00  200.00

तेलुगूत मोठ्या भावाला ‘अण्णा’ म्हणतात तर धाकट्याला ‘चिन्नण्णा!’ प्रस्तुत आत्मचरित्राचे नायक हिरालालजी पगडाल हे त्यांच्या कुटुंबात धाकटे असले तरी समाजात त्यांनी मोठं कार्य उभं केलंय. त्यामुळं हा ग्रंथ म्हणजे एका बंडखोर, प्रामाणिक, ध्येयवादी कार्यकर्त्याचा ‘आत्मशोध’ आहे. आयुष्याचं मूल्यमापन करताना त्यांनी कुठंही आत्मप्रौढी मिरवली नाही की वाचकांना शब्दबंबाळ केलं नाही. त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडताना त्यांनी जे प्रसंग दिले आहेत, जे वर्णन केलं आहे त्यातून त्यांची वाटचाल तर कळतेच पण राष्ट्राच्या प्रगतीची दिशाही ध्यानात येते.

500 in stock

पुस्तकाबद्दल

व्यवस्था परिवर्तनात प्रामुख्यानं प्रशासकीय, राजकीय लोकांचा वाटा मोठा असतो. यात हिरालालजी पगडाल यांच्यासारखे सामाजिक भान असणारे कार्यकर्ते, नेते महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आपल्या तर्कसुसंगत वागण्यानं, तत्त्वांशी तडजोड न करता ते जे काही घडवतात, निर्माण करतात ते म्हणूनच दखलपात्र ठरतं. आपल्या कार्यकर्तृत्वानं संपूर्ण समाज बदलावा अशी अपेक्षा कोणीही ठेवणार नाही; मात्र एखादी व्यक्ती बदलली, एखादं कुटुंब घडलं तरी ती मोठी गोष्ट असते. हिरालालजी यांनी समाजातील अनेक चुकीच्या प्रथा- परंपरा धाडसानं बंद पाडण्यात यश मिळवलं. टोकाची गरिबी वाट्याला येऊनही त्यांनी दगडावर झाड लावलं. ते रोपटं तो दगड फोडून मातीत रूजलं, वाढलं आणि पानाफुलांनी बहरलेल्या डौलदार वृक्षात त्याचं रूपांतर झालं. टोकाची प्रतिकूलता असतानाही हिरालालजी पगडाल यांनी त्यांच्यातील कार्यकर्ता, वक्ता, शिक्षक घडवला. कुणाचेही मिंधे नसल्यानं त्यांना भूमिका घेता आल्या. मनासारखं जगण्यासाठी जे नैतिक अधिष्ठान लागतं ते यातूनच प्राप्त होतं. त्यांचं जगणं संघर्षमय आहे. इवलीशी पणती ज्याप्रमाणे अंधाराचं साम्राज्य दूर करते त्याप्रमाणे हिरालालजींनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल केली आहे. म्हणूनच हे आत्मचरित्र प्रेरणादायी आणि अनेकांना उभारी देणारं ठरेल,याची मला खातरी आहे.

– घनश्याम पाटील 

अधिक माहिती

लेखक

हिरालाल पगडाल

पाने

280

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिन्नण्णा”

Your email address will not be published. Required fields are marked *