पुस्तकाबद्दल
साधारणत: 1930 ते 1990 असा अधोरेखित करून माझे मित्र सुनील शिनखेडे यांनी ‘हिंदोळ्यावर’ सगळ्यांना बसवून फार मोठं सांस्कृतिक काम केलेलं आहे. त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. त्यांचा पिंड कवीचा. सबंध साहित्य कला – संस्कृती – संगीत यावर त्यांचं नितांत प्रेम असल्यामुळेच त्यांनी वेळोवेळी वृत्तपत्रातून ठळकपणानं कवी, त्याची एखादी कविता, ती संगीतबद्ध असेल तर त्यातले बारकावे, गायक-गायिका आणखी खूप काही चिंतन असं त्याचं स्वरूप आहे. ते वरवरचं नाही. खोलवर त्या कवीच्या कवितेच्या आत तळघरात जाऊन ते शोधलं आणि मन:पूर्वक त्यासाठी लिहित राहिले. एकतर या कवितांची, गीतांची निवड ही अस्सल भावकवितेकडे जाणार्या श्रेष्ठ अशा कवितेची आहे. ती कविता – तो कवी, त्या काळातले संदर्भ हे बारीकबारीक तपशीलासह आणि सहज बोलावे असे सोप्या शब्दात लिहिलेले आहे.
– ना. धों. महानोर
(प्रस्तावनेतून)
Reviews
There are no reviews yet.