१०१ आजार, योग व निसर्गोपचार

 400.00  320.00

आज व्यवहारिक जगात अनेक अडचणींना, संघर्षांना, मानसिक द्वंद्वांना, आयुष्याबध्दल असलेल्या चुकीच्या समीकरणांना सामोरे कसे जायचे हेच समजणे त्यांना कठिण झाले. त्याची परिणिती ही झाली की आधुनिक काळात समाज रोगग्रस्त होण्यास सुरवात झाली.

यावर उपाय म्हणजे योग शास्त्र हे “योग चिकित्सा” म्हणुन वापरता येईल का असा विचार उत्पन्न झाला आणि अनेक संदर्भामुळे आणि संशोधनांमुळे हे सिध्द झाले की रोगाचे मुळ हे मानसिक आणि भावनिक त्रासामधेच आहे.

आज गरज आहे ती रोगाला मुळापासून नष्ट करण्याची. आणि असा एकमेव विषय आहे जो मनाची चिकित्सा करण्यासाठी समर्थ आहे आणि तो म्हणजे “योग”. म्हणुनच योग या शारिरीक नसुन मनोकायीक हे समजणे महत्वाचे आहे. योग फक्त शरीरासाठी नसुन शरिराद्वारे मनाला आणि मनाच्या अस्थिरतेला नियंत्रण करणारा विषय आहे. योग शरीरा द्वारे भावनिक संतुलन प्राप्त करणारा विषय आहे.

499 in stock

पुस्तकाबद्दल

जागतिक स्वास्थ्य संघटन (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) यांनी भारतातील सद्य परिस्थितीतील मानसिक रोग्यांचे दिलेले आकडे अत्यंत भयावह आहे. गरज आहे ती आजच मानसिक पातळीवर योग्य चिकित्सा करण्याची.स्वस्वरुपाचे ज्ञान प्राप्त करणे हा जरी योग विषयाचा मुख्य उद्देश असला तरीही आधुनिक काळाची गरज समजुन योग विषय हा चिकित्सा स्वरुपात वापरणे याची आज नितांत आवश्यकता आहे. जुन्या योग विषयक ग्रंथातही योग हे चिकित्सेसाठी उपयुक्त आहे असे सांगितलेले आढळते.

म्हणुनच डॉ.राजेंद्र वामन यांनी लिहिलेले “101 आजार – योग व निसर्गोपचार” हे योग चिकित्सा विषयक पुस्तक आधुनिक काळात सामान्य माणसांना निश्चितच उपयोगी राहिल असे मला वाटते. या “101 आजार – योग व निसर्गोपचार” पुस्तक लिखाणाच्या उपक्रमासाठी डॉ.राजेंद्र वामन यांचे मनःपुर्वक अभिनंदन…!!!

डॉ. मन्मथ मनोहर घरोटे

अध्यक्ष, दि लोणावळा योग इंस्टीट्युट (इंडिया)

अधिक माहिती

लेखक

डॉ. राजेंद्र वामन

पाने

264

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “१०१ आजार, योग व निसर्गोपचार”

Your email address will not be published. Required fields are marked *