पुस्तकाबद्दल
या पुस्तकात आकाशातील सूर्य, चांदोबा, ढगोबा आपल्याला भेटायला येतात. मुंगीताई, मनीमाऊ, फुलपाखरू, मोर, परी, पोपट हे सारेच आपल्याशी गुजगोष्टी करतात. झाडे मैत्रीचा हात पुढे करतात तर वारा आपल्याशी खेळ मांडतो. एकूणच या पुस्तकात निसर्गाची शाळा भरलेली दिसते. प्राण्यांची सभा गाली हसू फुलवते आणि या साऱ्यांतून आपली आनंदाची बाग बहरून जाते. या कवितांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या कविता कुठेही उपदेशाचा आव न आणता आनंदाबरोबरच एखादा चांगला विचार नकळत देऊन जातात.
अक्षर अक्षर शिकूया सारी
पुस्तके वाचा रे भारी भारी
असं म्हणणाऱ्या मलेका महेबूब शेख सैय्यद यांच्या ‘अक्षर अक्षर शिकूया’ या पुस्तकातील कविता मुलांना पुस्तकांचा लळा लावतील आणि त्यांचा आनंदाचा मळा सहजगत्या फुलवतील हे नक्की.
एकनाथ आव्हाड
साहित्य अकादेमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त कवी.
Reviews
There are no reviews yet.