पुस्तकाबद्दल
भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथांच्या माध्यमातून सदानंद भणगे सातत्यानं आपल्या भेटीस येत असतात. अमेरिकेच्या वास्तव्यात असताना त्यांनी ‘चपराक’च्या दिवाळी अंकासाठी ‘अंक तीन, प्रवेश पाच’ ही कथा लिहिली होती. अर्थातच ती अफाट वाचकप्रिय ठरली. प्रत्यक्षात हा विषय कादंबरीचा असल्याने नंतर त्यांनी तो फुलवला आणि त्याचे फलित म्हणजे ही कादंबरी आपल्यासमोर आहे. एक सर्वोत्तम कथा आणि त्याची पुढे तितकीच दमदार कादंबरी याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.
Reviews
There are no reviews yet.