अणीबाणी – लोकशाहीला कलंक

Original price was: ₹ 150.00.Current price is: ₹ 120.00.

अणीबाणीच्या कालखंडातल्या काळ्याकुट्ट कारस्थानाची पुढच्या पिढीला माहिती होणे अधिक गरजेचे वाटू लागले आणि तशी मागणी सामान्यपणे आणि आग्रहाने समाजातून होऊ लागली. म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी खरे तर ह्या संबंधात लिखित इतिहास प्रकाशित होणे व तो मोठ्या प्रमाणात नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता होती पण ते झाले नाही. म्हणून ते काम या पुस्तकाच्या माध्यमातून हाती घेणे भाग पडले आहे..
विजय जोशी यांचे हे नवे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवे.

anibani By Vijay Joshi

पुस्तकाबद्दल

अणीबाणीच्या कालखंडात साधारणतः दीड वर्ष ते 21 महिने अनेक कार्यकर्त्यांनी कारागृहात यमयातना सहन केल्या. असे असले तरी गेल्या 45 वर्षांपूर्वी घडलेल्या या कालखंडात काँग्रेसी राजवटीने श्रीमती इंदिरा गांधी यांच्या रूपाने संपूर्ण देशवासियांच्या स्वातंत्र्यावरच वरवंटा फिरवला. लोकशाहीच संपुष्टात आणली. लोकशाहीच्या नावाने देशभर हुकूमशाहीचा नंगा नाच चालवला. असे असले तरीही आजच्या पिढीला या सार्‍याची जाणीव तर सोडा पण त्याची साधी माहितीही नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या माहितीसाठी हे महत्त्वपूर्ण पुस्तक.