पुस्तकाबद्दल
मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील मंगरूळसारख्या एका छोट्या गावात राहणार्या शिरीष पद्माकर देशमुख यांनी अशाच बारीकसारीक गोष्टींतून खूप मोठा बोध आपल्याला दिला आहे. शिरीष देशमुख हे शिक्षक आहेत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते काळ्या मातीत राबणारे शेतकरी आहेत. बालगोपाळांचं मानसशास्त्र त्यांना चांगलं उमगतंच पण आजूबाजूच्या परिस्थितीत परिवर्तन घडवायचं तर वरवरच्या बदलांना काही अर्थ नसतो याची त्यांना जाणीव आहे. माणसानं अंतर्बाह्य निर्मळ आणि निडर व्हावं असं त्यांना वाटतं. त्यातूनच या कथा जन्मास आल्या आहेत.
बारीकसारीक गोष्टी या फक्त बालकुमारांसाठीच नाहीत तर मोठ्यांनाही यातून बोधामृत मिळेल. आपण काही फार मोठा उपदेश करतोय आणि त्यातून समाजसुधारणा घडेल असाही त्यांचा आव नाही. या गोष्टी थेट मनावर बिंबतात, हृदयाला भिडतात. आपल्या संस्कारांचं आणि संस्कृतीचं संचित शिरीष देशमुखांनी या कथांच्या माध्यमातून दिलंय. मुलांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांचं मनोबल उंचवावं, या देशाचे सशक्त, भक्कम आणि सुदृढ नागरिक म्हणून त्यांची जडणघडण व्हावी यासाठीचं हे बाळकडू आहे. एखाद्याच्या आयुष्यात बाळगुटी जितकी महत्त्वाची तितक्याच या कथा बालकुमारांसाठी संजीवक ठरणार्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.